Posts

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, वाशिम यांचे मार्फत SVEEP कार्यक्रमाअंतर्गत *रील्स* स्पर्धेचे आयोजन

Image
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, वाशिम यांचे मार्फत SVEEP कार्यक्रमाअंतर्गत *रील्स* स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असुन जिल्ह्यातील नागरिकांनी व शालेय - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई २ लाख १० हजार जप्त

Image
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई २ लाख १० हजार जप्त पिंपळा येथे १ लाख १५ हजार व पन्हाळा चेक पोस्टवर ९५ हजार रोकड जप्त  वाशिम,दि.१५ (जिमाका)  १४ एप्रिल रोजी वाशिम तालुक्यातील पन्हाळा फाटा येथे पुसदकडून येणाऱ्या एम एच ३७ व्ही २९११ ब्रिझा वाहनाची तपासणी केली असता ९५ हजार व आज १५ एप्रिल रोजी अमरावतीकडून येणाऱ्या मारोती एस प्रेसो एमएच २७ डीए ३५०६ या वाहनाची तपासणी केली असता १ लाख १५ हजार रुपये रक्कम आढळून आली. सदर रकमेबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणताही पुरावे आढळले नाही.  उपरोक्त कार्यवाही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी वाशिम बुवनेश्वरी एस. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थिर सर्वेक्षण पथकातील सदस्य पथक प्रमुख रवि राठोड व गोपाळ ईढोळे व पथकातील कर्मचारी यांनी केली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४८ हजार ६३३ पोस्टल बॅलेट पेपर व १ हजार २५३ नमुना १२ हस्तांतरित

Image
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ८ हजार ६३३ पोस्टल बॅलेट पेपर व  १ हजार २५३ नमुना १२ हस्तांतरित वाशिम,दि.१५ (जिमाका) लोकसभा सार्वत्रिक निवडणुक - २०२४ अंतर्गत वाशिम जिल्ह्यात २६ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. तथापी, निवडणूक कामाकरीता नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांपैकी ज्यांना २६ एप्रिल रोजी मतदार केंद्रावर जावुन प्रत्यक्ष मतदार करणे शक्य नाही अशा सर्वांकडुन भरण्यात आलेला नमुना १२ व त्यांना पाठविण्यात येणाऱ्या पोस्टल बॅलेट पेपरची देवाण-घेवाण करण्याकरीता सर्व संबंधित सहायक निवडणुक अधिकारी यांचे करीता १४ एप्रिल रोजी जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने सदर शिबीराकरीता नांदेड, हिंगोली, परभणी, अकोला, अमरावती, वर्धा, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या जिल्ह्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते व त्यांचेव्दारे एकुण १ हजार २५३ नमुना १२ व एकूण ८ हजार ६३३ पोस्टल बॅलेट पेपर हस्तांतरीत करण्यात आले. आणि पुढील शिबीर १८ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले आहे.असे  जिल्हा नोडल अधिकारी टपाली मतपत्रिका  तथा जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ २१४ पथकांचे प्रशिक्षण संपन्न

Image
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ २१४ पथकांचे प्रशिक्षण  संपन्न वाशिम,दि.१५ (जिमाका) आज १५ एप्रिल रोजी १४ यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघांतर्गत नेमणूक झालेल्या मतदान अधिकारी यांचे द्वितीयप्रशिक्षण संपन्न झाले. या प्रशिक्षणामध्ये सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात २१४ पथकांचे प्रशिक्षण घेण्यात आले. प्रत्येक पथकात एक मतदान केंद्राध्यक्ष व तीन मतदान अधिकारी  उपस्थित होते. या प्रशिक्षणास जिल्हाधिकारी  बुवनेश्वरी एस यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच १४ यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यवतमाळ जिल्हाधिकारी  पंकज आशिया यांनी नियुक्त केलेले समन्वय अधिकारी श्री. पवार,  तहसीलदार वाशिम निलेश पळसकर व तहसीलदार मंगरूळपीर शीतल बंडगर ह्या उपस्थित होत्या. या प्रशिक्षणास सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा एसडीओ मंगरूळपीर राजेंद्र जाधव, तहसीलदार निलेश पळसकर यांनीही मार्गदर्शन केले.           या प्रशिक्षणाचे आयोजन हे दोन ठिकाणी करण्यात आले होते मुख्य प्रशिक्षण हे काळे लॉन आरे कॉलेज रोड वाशिम येथे व त्याच पथकांचे मतदान हाताळणी यंत्राचे प्रशिक्षण नवोदय विद्यालय वाशिम येथे घेण्यात आले. प्रशिक्षणानं

जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी रामनवमी यात्रेच्या अनुषंगाने पोहरादेवी येथे घेतला आढावा

Image
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी रामनवमी यात्रेच्या अनुषंगाने पोहरादेवी येथे घेतला आढावा वाशिम,दि.१२ (जिमाका)पोहरादेवी येथील रामनवमी यात्रेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या अध्यक्षतेखाली  पोहरादेवी येथे यंत्रणा प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये सभा घेण्यात आली.     यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वैभव वाघमारे , निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे वाशिम, उपविभागीय अधिकारी कारंजा कैलास देवरे , उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा प्रदीप पाडवी , अधीक्षक अभियंता एमएसईबी अजय शिंदे , तहसीलदार मानोरा संतोष यावलीकर, पोलीस निरीक्षक मानोरा प्रवीण शिंदे , कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा अजिंक्य वानखडे , कार्यकारी अभियंता मजिप्रा निलेश राठोड ,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत व इतर यंत्रणेचे प्रमुख यांची उपस्थिती होती.      पोहरादेवी यात्रेच्या अनुषंगाने काही उपाययोजना करणे आवश्यक होत्या त्याची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली. पोहरादेवी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणामध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी नळ बसविणे व जागेचे सपाटीकर